जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार


माय अहमदनगर वेब टीम

15 सप्टेंबर, मंगळवारचे ग्रह-तारे शिव आणि आनंद नावाचे 2 शुभ योग तयार करत आहेत. यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जॉब आणि बिझनेसमधील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कष्टाचे फळ मिळेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...


मेष : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयास वेळ देण्याचा प्रयत्न कराल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्या.


वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६

आज रिकाम्या गप्पा टाळा. कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. धंद्यात आवक मनाजोगती राहील. मूड छान राहील.


मिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे. रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.


कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आज तुमची काही गुपिते उघड होतील.


सिंह : शुभ रंग : हिरवा|अंक : ३

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहे. घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवा.


कन्या : शुभ रंग : आकाशी|अंक : २

आनंदी व उत्साही असा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज इच्छापूर्तीचा दिवस.


तूळ : शुभ रंग : जांभळा|अंक : ४

जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील. मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल.


वृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ५

कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. आज सत्संगाकडे पावले वळतील.


धनू : शुभ रंग : भगवा|अंक : ७

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. ‘अहो, सर सलामत तो पगडी पचास’ हे लक्षात घ्या.


मकर : शुभ रंग : तांबडा|अंक : ९

नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. एखादा महत्त्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.


कुंभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही अटीतटीचे प्रश्न चतुराईने सोडवाल.


मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

विविध मार्गांनी आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. दूरच्या प्रवासात खोेळंबा होण्याची शक्यता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post