...म्हणून भाजपाच्या आमदाराला अटक


 माय अहमदनगर वेब टीम

आष्टी - ऊसतोड मजुरांचा संप सुरू असताना साखर कारखान्यावर जात असलेल्या ऊसतोड मजुरांना आ. सुरेश धस यांच्या समर्थकांनी आष्टी येथे अडवले. याप्रकरणी सुरेश  धस यांच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना आज दुपारी अटक केली.     

महाराष्ट्रात ऊसतोड मजूरांचा संप सुरु असताना मालेगाव, नाशिक येथून काही ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे तीन ट्रक मिरजगाव (जि.अहमदनगर) च्या हद्दीत म्हाडा तालुका, कर्जत तालुक्यातील अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर चालले होते. सुरेश धस समर्थकांनी त्यांना थांबवून आष्टी येथे घेऊन आल्यानंतर या वाहनांमधून जवळपास ४०० ते ४५० मजूर आपल्या लहान मुलांसहीत कुठलीही काळजी न घेता जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. या मजूरांची कसल्याही प्रकारची कोरोनाची टेस्ट करण्यात आलेली नाही. 

सध्या कुठलाच कारखाना सुरु नसतानाही ही मजूर वाहतूकीची घाई कशासाठी असे सांगत सरकार जोपर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्या वाढीबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत ऊसतोड मजूर आम्ही जाऊ देणार नाहीत. तसेच सध्या आमचा संप शांततेत सुरु असून अशा पद्धतीने कारखानदार वाहतूक करणार असतील तर आम्हाला आमचा संप अधिक आक्रमक करावा लागेत असा इशारा आ. सुरेश धस यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post