माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डेस्क - सुंदर महिलांनी आपली योग्य काळजी न घेतल्यास त्यांच्या सौंदर्यावर वाईट परिणाम पडू शकतो. त्यामुळे जर सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर योग्य ती काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्वचा खराब होणे, केस रूक्ष होणे, दात पिवळे दिसू लागणे, यामुळे सौंदर्यात बाधा येते. सौंदर्य कायम ठेवण्यासाठी या १० वाईट सवयींपासून नेहमी दूर राहणे आवश्यक आहे.
या सवयी सोडून द्या
* पिंपल्सला वारंवार हात लावू नका. पिंपल्स नष्ट करण्यासाठी त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे डाग पडतात आणि पिंपल्सचे प्रमाण वाढते. इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.
* थकव्यामुळे चेहरा न धुता झोपू नका. यामुळे चेहरा डल दिसू लागतो. हळूहळू सुरकुत्या पडू लागतात. एजिंग स्पॉट्सही दिसू लागतात. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आवश्य धुवून घ्यावा.
* भरपूर पाणी तरी प्या, यामुळे चेहरा ग्लो करेल. पोटाच्या समस्या निर्माण होणार नाहीत. पोट जेवढे साफ राहील चेहरा तेवढाच उजळ दिसेल.
* कोंडा होऊ नये म्हणून दररोज केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. डोके खाजवल्याने केसातील कोंडा नखांमध्ये जाऊन बसतो. त्यानंतर तुम्ही त्याच हाताने जेवण करता आणि आजारी पडता.
* खाण्यापिण्यापुर्वी हात स्वच्छ धुवावेत. बाहेरून घरी आल्यानंतर हात साबणाने न धुता तुम्ही काही खाल्ल्यास पोटाचे आजार होतात.
* जंक फूड खाऊ नका. या सवयीवर निंयत्रण ठेवणे आवश्यक आहे.
* नेहमी आनंदी राहीले तर चेहरा उजळतो.
* व्यायाम करा, अन्यथा लठ्ठपणा वाढेल. आळस जाणवेल. व्याव्याम केल्याने चेहरा चमकदार होतो.
* दातांनी नख कुरतडणे वाईट आहे. यामुळे नखांमधील विषाणू, घाण पोटात जाते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. नखे नेहमी स्वच्छ ठेवावेत, हातांवर गरम पाणी टाकून नखांमधील घाण काढू शकता.
* जागरण करू नका. शरीराला पूर्ण झोप आवश्यक आहे. यामुळे सकळी चेहरा फ्रेश दिसेल. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढते.
Post a Comment