अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी गुड न्युज



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजय दत्तने कर्करोगाचा पराभव केला आहे. संजय दत्तचे जवळचे मित्र आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट राज बन्सल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सोमवारी, 61 वर्षीय संजूचे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन झाले असून त्याच्या रिपोर्टमध्ये संजू आता कर्करोगमुक्त असल्याचे समोर आले आहे. पीईटी स्कॅन ही सर्वात ऑथेंटिक तपासणी समजली जाते. त्यातून कर्करोगाने पीडित व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशींची स्थिती काय आहे हे समजते. संध्याकाळपर्यंत संजय दत्त आणि मान्यता दत्त अधिकृत माहितीही शेअर करू शकतात.

रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, "वास्तविक कर्करोगाच्या पेशींमध्ये कर्करोग नसलेल्या पेशींपेक्षा मेटाबोलिक दर जास्त असतो. या उच्च स्तरावरील रासायनिक क्रियेमुळे कर्करोगाच्या पेशी पीईटी स्कॅनवर चमकणा-या डागासारख्या दिसतात. यामुळे पीईटी स्कॅन कर्करोगाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात कर्करोग किती पसरला आहे, हेदेखील यातून कळू शकते."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post