माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळते. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, इशान खट्टर असे अनेक स्टारकिड्स सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. आता अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी ही देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती एका चित्रपटात भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे.या चित्रपटाचे नाव ‘सुट्टाबाजी’ असे असून करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडानच्या काळावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जाते. लॉकडाउनच्या काळातील कुटुंबातील नात्यांवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात रिनी एका बिघडलेल्या मुलीची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराना करणार आहेत.यापूर्वी सुष्मिता सेनने अनेक मुलाखतींमध्ये रिनीला भविष्यात अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती अभिनयाचे धडे घेत असल्याचे सांगितले होते. तसेच रिनीला गाण्याची देखील आवड असल्याचे सुष्मिताने सांगितले होते. त्यामुळे आगामी चित्रपटात ती गाणे गाणार असल्याचे म्हटले जाते.
Post a Comment