माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १७ नगरपालिका, नगरपंचायतीच्या निरीक्षकांची तसेच संघटनात्मक कामा करिता प्रत्येक तालुक्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी जाहीर केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नगरपालिका, नगरपंचायत निहाय निरीक्षक पुढील प्रमाणे :
शिर्डी - सौ.मीनलताई खांबेकर, शेवगाव - कार्लस साठे, पारनेर - संजय महांडुळे, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड - बाळासाहेब हराळ, राहुरी -श्रीकांत मापारी, संगमनेर - बाबासाहेब धोंडे, देवळाली प्रवरा - संजय पोटे, अकोले - बाबासाहेब कोळसे, जामखेड - शंकर देशमुख, श्रीगोंदा - सुलतान शेख, कर्जत -ज्ञानदेव गवते, श्रीरामपूर - हिरालाल पगडाल, कोपरगाव - सुभाष तोरणे, पाथर्डी - प्रा. शिवाजी काटे, राहता - शिवाजी नेहे, नेवासा - बाळासाहेब चव्हाण.
तालुकानिहाय निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे :
नगर तालुका - Adv. कैलास शेवाळे, श्रीगोंदा - प्रवीण घुले, कर्जत - धनसिंग भोईटे, कोपरगाव - डॉ.एकनाथ गोंदकर, श्रीरामपूर - गणपतराव सांगळे, शेवगाव - जालिंदर काटे, जामखेड - माणिकराव मोरे, राहुरी - अंकुश कानडे, नेवासा - ज्ञानदेव मुरकुटे, पारनेर - महादेव कोकाटे, राहता - इंद्रभान थोरात, अकोले -विष्णुपंत खंडागळे, पाथर्डी - बाबासाहेब गुंजाळ, संगमनेर - समीर बागवान.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस तथा समन्वयक ज्ञानदेव वाफारे आदींनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment