'तुळजाभवानी मातेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर उघडण्याची सद्बुद्धी द्यावी'



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- राज्यातील आघाडी सरकारने भाविकांच्या भावनांचा विचार न करता नवरात्रातही मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे न उघडण्याच्या निर्णयाचे गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशातील मंदिरे उघडण्याचा आदेश केव्हाच दिले आहे. मात्र केंद्र सरकारचा एक व राज्य सरकारचा वेगळाच आदेश आहे. नागरिकांनी नक्की आदेश पाळायचा कोणाचा? आम्ही आज केंद्र सरकारने मंदिर उघडण्याचा दिलेल्या आदेशाचे पालन करत घोषणा केल्याप्रमाणे गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधीवत घटस्थापना केली आहे. यानंतरही जर राज्य सरकारने मंदिरे उघडली नाही तर भाविकांच्या सहन शक्तीचा अंत होईल व मोठा उद्रेक राज्यात होईल. तरी तुळजाभवानी मातेने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी. मंदिरे उघ्ल्याने जर गुन्हा दाखल झाला तरी न घाबरता त्यास तोंड देवू, पण हे मंदिर बंद करणार नाही, अस ईशारा घटस्थापनेनिमित्त गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केली.

शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त गौरी घुमट येथील गौरीशंकर मित्रमंडळाच्या  तुळजाभवानी मातेच्यामंदिरात शनिवारी सकाळी प्रसन्न, भक्तिपूर्ण वातावरणात व मंत्रोच्चारात तुळजाभवानी मातेच्या मुर्तीवर विधिवत अभिषेक करुन मंडळाचे संस्थापक वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व भाविकांनी ‘आई राजा उदो..उदो.., बोल साचे दरबार कि जय .... ’ असा जय घोष केला. विविध क्षेत्रातील 11 दाम्पंत्याच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. 

    यावेळी प्रमुख उपस्थित असलेले शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने गेल्या तीनचार महिन्यांपासून सातत्याने राज्य सरकारकडे मंदिरे उघडण्याची विनंती करत आंदोलने केली. मात्र गणेशोत्सव गेला, आता नवरात्र सुरु झाले तरीही मंदिरे बंदच आहेत. याचा निषेध करत वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून घटस्थापना केली. हिंदू भाविक आता शांत बसण्याच्या मन:स्थितीत नाही, त्यामुळे सरकारने ताबोडतोब मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा. 

यावेळी ज्येष्ठ नेते एल.जी.गायकवाड, सदाभाऊ शिंदे, हरिभाऊ डोळसे, बापू ठाणगे, मंडळाच्या अध्यक्षा आरती आढाव, शांताराम राऊत, रवि चवंडके, आशुतोष देवी, प्रदिप बोगावत, बाळासाहेब भुजबळ, निलेश लाटे, अशोक कानडे, जयंत येलूलकर, सागर शिंदे, संतोष शिंदे, महेश साळी, संजय वल्लाकट्टी, छाया शिंदे, सुशीला शिंदे, सोनाली चवंडके, संदिप शिंदे आदिंसह मंडळाचे सदस्य महिला समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post