३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९८ बाधित
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९३५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६० आणि अँटीजेन चाचणीत ३२७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०,
अकोले १६, जामखेड ०१, कोपरगाव ०२,नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०१, पाथर्डी ०५, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ११, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३३, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण २१, नेवासा ०६, पारनेर ०६, पाथर्डी ०२, राहाता ३३, राहुरी ११, संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३२७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १२, अकोले २२, जामखेड ४६ कर्जत ३६, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १०, नेवासा ०२, पारनेर ०५, पाथर्डी ४१, राहाता ०७, संगमनेर २२, शेवगाव ३८, श्रीगोंदा ५१, श्रीरामपूर २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ३५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ५०, अकोले ३०, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २३, नेवासा १५, पारनेर ०८, पाथर्डी ३४, राहाता ३८, राहुरी ०७, संगमनेर ३८, शेवगाव २४, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:४१४३३*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३९३५*
*मृत्यू:७३६*
*एकूण रूग्ण संख्या:४६१०४*
Post a Comment