“पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?”



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. कंगना आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान या एफआयआरवर कंगनाने प्रतिक्रिया दिली. “पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?” असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे.“कोण कोण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे? आज नवरात्रीच्या निमित्ताने काढलेले हे फोटो पाहा. मी देखील उपवास ठेवणार आहे. माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली. या ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post