माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जिम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.
Post a Comment