माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - काही विकृत मनोवृत्तीच्या नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या मुलीला सोशल मीडियाच्या पोस्टवरील कमेंट्सच्या माध्यमातून बलात्काराची धमकी दिली
मुंबईः कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात १० धावांनी पराभव झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर सोशल मीडियावरून धोनीवर टीका होऊ लागली. यातच काही विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या ६ वर्षीय मुलीला बलात्काराची धमकी दिल्यासा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरानंतर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी फारशी समाधानकारक कामगिरी करु शकला नाही. त्यामुळं धोनीवर सातत्याने टीका होत आहे. परंतु, काहींनी धोनीची लेक झिवा हिच्यावरही बलात्काराची धमकी दिली आहे. या घटनेवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे तर ट्रोलर्सची चांगलीच कानउघडणी केली आहे.
Post a Comment