माय अहमदनगर वेब टीम
पाटणा: बिहार निवडणूक प्रचाराला बिहारच्या दौऱ्यावर गेलेले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरचे पंखे पाटणा विमानतळाजवळ तारांना अडकून तुटले. मात्र, हा अपघात होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे या हेलिकॉप्टरमधून उतरले होते. पाटणा विमानतळाच्या स्टेट हँगरजवळ ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्री सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताबाबत कोणतीही अफवा पसरू नये यासाठी रविशंकर प्रसाद यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. अपघाताची कोणतीही घटना घडली नसून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सुरक्षित असल्याचे त्याच्या कर्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
Post a Comment