माय अहमदनगर वेब टीम
उस्मानाबाद - रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांच्यावर निशाना साधला. पक्ष सोडून गेलेले गेलेले अनेकजण संपर्कात आहेत, पण उस्मानाबादमधील सोडून गेलेल्यांना आता राष्ट्रवादीत एन्ट्री नाही', असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर तुळजापूर येथे अधिकार्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. दुसर्या दिवशी सोमवारी तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता, हात जोडून उस्मानाबाद जिल्ह्यातून आपल्याला सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षप्रवेश देणार नसल्याचे सांगितले. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसत आहे.
Post a Comment