माय अहमदनगर वेब टीम
पंढरपूर - मागील काही दिवसांपासून राज्यभर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पंढपुरातही हाहाकार उडाला आहे. पंढरपुरातील चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे काहीजण भिंतीच्या आडोशाला उभे होते. यादरम्यान भिंत कोसळली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. सध्या मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
Post a Comment