राज्यपाल-सरकार वाद ; बाळासाहेब थोरातांनी केला राज्यपालांना 'हा' सवाल

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादाची धूळ अजूनही खाली बसलेली नाही. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post