तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? जाणून घ्या


माय अहमदनगर वेब टीम

मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२०. चंद्र सूर्याचे स्वामीत्व असलेल्या सिंह राशीत विराजमान असेल. शुक्र या राशीत आधीपासून विराजमान आहे. शुक्र आणि चंद्राचा योग शुभ मानला जात आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी दिवस उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? अन्य कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया... 


आजचे मराठी पंचांग : मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२०


मेष : छोटे प्रवास घडतील. छोट्या आजारांवर लगेच उपचार करा. एखादी विशेष व्यवस्था करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. समजुतीत बदल होण्याची शक्यता. एखाद्या प्रति मनात आकर्षण भावना निर्माण होऊ शकेल. दिनक्रम व्यस्त राहिला, तरी प्रसन्नता लाभेल. दोन्ही बाजू समजून घेऊन नवीन कार्यारंभ करणे हिताचे ठरू शकेल. 


वृषभ : अचानकपणे अनावश्यक पैसे खर्च होतील. घरात आनंदी वार्ता समजेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे दिवस शुभ ठरू शकेल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील. प्रतिष्ठा, मान, सन्मानात वृद्धी होऊ शकेल. धन, संपत्तीबाबतीत लाभाचे योग जुळून येऊ शकतील. व्यवसायात प्रगतीकारक दिवस. नवीन करार पूर्णत्वास जाऊ शकेल. 

मिथुन : महत्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या. निकाल आपल्या बाजूने लागतील. धावपळ करावी लागू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. एखाद्या प्रसंगी मतभेद संभवतात. अतिथींच्या येण्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. 

कर्क : आपल्या बोलण्याच्या कौशल्याने प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नोकरीत उत्साही वातावरण राहील. राशी स्वामीचा भक्कम पाठिंबा लागेल. संपत्तीत भर पडू शकेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. व्यवसायासाठी प्रगतीकारक दिवस. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. 

सिंह : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. आत्मविश्वास उंचावेल. आजचा दिवस भाग्यकारक असेल. शुक्राचा पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणा, निष्ठा आणि मधु वाणीने सर्वांची मने जिंकू शकाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. 

कन्या : आपल्या कला गुणांमुळे कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मोठ्या वस्तू खरेदीचा घाट घालाल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा करू शकाल. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची संधी मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नोकरदार वर्गासाठी दिलासादायक दिवस. व्यापारी वर्गाला लाभाचा दिवस. मात्र, वादविवादांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कर्जाचे व्यवहार टाळावेत. 

तुळ : सामाजिक प्रतिष्ठा योग्य तऱ्हेने जोपासा. जवळच्या व्यक्ती आपल्याला आदर्श मानतील. आजचा दिवस समाधानकारक राहील. चारही बाजूंनी मदतीचे हात पुढे येतील. एखादी भेटवस्तू मिळू शकेल. मान, सन्मान मिळतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना यशस्वी ठरू शकेल. 

वृश्चिक : सरकारी कामे मार्गी लागतील. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिनक्रम व्यस्त राहील. दिवसभरात काही ना काही लाभ मिळतील. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. भविष्यात यातून फायदा मिळेल. दिवस आनंदात आणि उत्साहात व्यतीत होईल. भाग्याची पूरेपूर साथ लाभेल. रुचकर आणि आवडीच्या भोजनाचा लाभ घेऊ शकाल.

धनु : स्वतःवरील विश्वास मोडून देऊ नका. व्यवहारात कोणी फसवणार नाही याची काळजी घ्या. काही समस्यांचे निराकरण होऊ शकेल. न्यायालयीन प्रकरणांत सकारात्मक वार्ता मिळू शकतील. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. यामुळे धनसंचय वाढू शकेल. आत्मविश्वास वाढीस लागेल. मन प्रसन्न राहील. 

मकर : नोकरीत मोठ्या संधी प्राप्त होतील. आपल्या तत्वांना मुरड घालू नका. आजचा दिवस परोपकार करण्यात आणि धावपळीत व्यतीत होऊ शकेल. व्यापारी वर्गासाठी शुभ दिवस. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. 

कुंभ : सरकारी निर्णय आपल्या बाजूने लागतील. घरातील छोट्या मुलांची काळजी घ्या. भाग्याची साथ मिळेल. धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. कीर्ती वृद्धिंगत होईल. मित्रांचे पूरेपूर सहकार्य लाभेल. विरोधक पराभूत होतील. सुवार्ता मिळतील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंदाची अनुभूती घेऊ शकाल. 

मीन : जुनी सर्व कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी अति संघर्ष टाळा. घरात शुभ कार्याच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकेल. विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. विद्यार्थी वर्गाला यशकारक दिवस. भाग्य वृद्धिंगत होईल. घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल. धार्मिक कार्यातील आवड वाढीस लागेल. दिवसाचा उत्तरार्ध मित्र, मंडळींसोबत उत्तम जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post