माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - चलनी नोटा आणि स्मार्टफोनच्या स्क्रीनवर कोरोना विषाणू 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियातील नॅशनल सायन्स एजन्सीच्या संशोधनात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी तीन वेगवेगळ्या तापमानात अंधारात कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाची चाचणी केली. त्यात 20 अंश सेल्सियस तापमानात फोन स्क्रीनवर गुळगुळीत पृष्ठभागावर कोरोना व्हायरस अधिक सक्षम झाला. काच, स्टील, प्लास्टिक, नोटांवर कोरोना व्हायरस 28 दिवस जगू शकेल. तर 30 अंश सेल्सियस तापमानात कोरोना विषाणू सात दिवस जिवंत राहू शकेल.
40 अंश सेल्सियस तापमानात कोरोना विषाणू केवळ 24 तास जगू शकेल. कापसावर सर्वात कमी तापमानात कोरोना व्हायरस 14 दिवस जिवंत राहू शकतो. दरम्यान, जिवंत राहणार्या विषाणूचा अंश संसर्गास कारणीभूत ठरू शकतो, असे ऑस्ट्रेलियाच्या सेंटर फॉर डिसीज प्रिपेयरडनेसचे संचालक ट्रेवर ड्रीव्ह यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्पर्शाबाबतचा निष्काळजीपणा कोरोना संसर्गाचे कारण ठरू शकतो.
Post a Comment