आज कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

 



माय अहमदनगर वेब टीम

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२०. चंद्र मंगळाचे स्वामीत्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान असेल. या राशीत केतु असल्यामुळे चंद्र आणि केतुच्या योगाने ग्रहण योग जुळून येत आहे. नवरात्राचा दिवस आहे. एकूण ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घेऊया... 

आजचे मराठी पंचांग : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२०

मेष : जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची पूर्व शहानिशा करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता. व्यापारी वर्गाने नवीन गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे. याचा भविष्यात लाभ मिळू शकेल. 

वृषभ : दोघांच्या भांडणात पडू नका. घरामध्ये खबरदारी देऊन काम करा. दिवसभरात काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. मन शांत करून कार्यरत राहावे. कार्यालयातील सहकाऱ्यांशी वाद होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात धैर्याने परिस्थिती हाताळणे हिताचे राहील. शेजारी मदत करतील. 

मिथुन : मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस विशेष ठरेल. मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला किंवा व्यवसायिकांना शुभवार्ता मिळू शकतील. कार्यक्षेत्रात विशेष मान, सन्मान मिळू शकतील. घाईने निर्णय न घेणे हिताचे ठरू शकेल. 

आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; कोण आहेत नवदुर्गा? वाचा, महात्म्य

कर्क : स्थावर मालमत्तेत पैसा गुंतवला जाईल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्या. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. बुद्धी, विवेक, नवनवीन कार्याच्या शोधासाठी उपयुक्त ठरतील. समोरच्या व्यक्तींमधील चुका शोधणे सोडल्यास दिवस उत्तमरित्या पार पडू शकेल. 

सिंह : घरामध्ये शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. मौल्यवान वस्तू प्राप्त होऊ शकेल. आवडत्या वस्तूंच्या खरेदी कराल. गरजूंना मदत करणे हिताचे ठरू शकेल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडू शकेल. कुटुंबासोबत उत्तम काळ व्यतीत होईल. वाणीतील मधुरता नातेसंबंध घट्ट करू शकेल. 

कन्या : कष्टाच्या दुप्पटीने यश मिळेल. वडिलोपार्जित धंदा पुढे चालवल्यास फायद्याचे ठरेल. स्पर्धेत विजय शक्य. पराक्रमात वाढ होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक खर्च उद्भवू शकतील. तर, दुसरीकडे प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे योग आहेत. 

तुळ : अनावश्यक खर्च कमी करा. नवीन व्यवसायात सावधानतेने पावले टाका. अधिक परिश्रमांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. कुटुंबाचे, मित्रांचे योग्य सहकार्य लाभू शकेल. शुभवार्ता मिळतील. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल. पण, जबाबदाऱ्याही वाढतील. कार्यक्षेत्रात कौतुक, प्रशंसा होईल. 

वृश्चिक : आपण केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर प्रकट करा. आजचा दिवस संमिश्र असेल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. अनावश्यक खर्च उद्भवतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. मात्र, संयम आणि धैर्याने परिस्थिती हाताळणे हिताचे ठरू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी शुभवार्ता उत्साह वाढवेल. मन प्रसन्न राहील. 

धनु : आपला आत्मविश्वासात कायम ठेवा. घरासंबंधी काही कामे काढली असतील तर ती पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकेल. भौतिक सुखाची अनुभूती घेऊ शकाल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. आहारावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल. 

मकर : आपला संयम आपल्या कामी येईल. दरवेळेस अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेचा आपल्याला लाभ मिळू शकेल. एखादा जुना वाद संपुष्टात येऊ शकेल. व्यवसायासाठी करत असलेले प्रयत्न भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. मन प्रसन्न राहील. 

कुंभ : नोकरीत कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. आपल्या चातुर्याचे कौतुक होईल. भविष्यातील एखाद्या नव्या योजनेवर भर राहील. कार्यालयात अधिकारी वर्गाच्या मदतीमुळे कामे यशस्वी होतील. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरू शकेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम संगीताचा आस्वाद घेऊ शकाल. 

मीन : नवीन नोकरीची संधी सापडेल. छोटे प्रवास संभवतात. हितशत्रूंचा त्रास संभवतो. दिवसभर काही ना काही कारणाने मन विचलित राहू शकेल. मुलांसोबतचे नातेसंबंध दृढ होऊ शकतील. पदोन्नतीचे योग प्रबळ. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम ठरू शकेल. अतिथींचे आगमन होण्याची शक्यता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post