या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल?

 



माय अहमदनगर वेब टीम

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस शनीचे स्वामीत्व असलेल्या मकर राशीत विराजमान असेल. शनी आणि चंद्र दोन्ही ग्रह मकर राशीत असल्याचा मिथुन राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ संभवतो. नवरात्राची आठवी माळ असून, तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

मेष : व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. खूप चांगले विचार मनामध्ये घोळत राहतील. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. मात्र, कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये. कोणत्याही वादापासून दूर राहावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बोलताना तारतम्य बाळगावे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. विरोधक परास्त होतील.

वृषभ : प्रवासाचे योग येतील. आहारातील पथ्य वेळोवेळी पाळा. वैवाहिक जीवन सुखमय असेल. धन, पद, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकेल. जोडीदाराला आर्थिक लाभ संभवतो. कार्यक्षेत्रात प्रगती शक्य. मन प्रसन्न राहील. 

मिथुन : नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडतील. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्या. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. धनलाभाचे योग संभवतात. हितशत्रूंपासून सावध राहावे. कौटुंबिक जीवनात सुख, शांतता लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. व्यापारातील गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. 

कर्क : व्यवसायातील चलती पुन्हा एकदा दिसून येईल. चांगली वार्ता समजेल. मध्यम फलदायी दिवस. विद्यार्थ्यांनी भविष्यातील योजनांवर काम करणे हिताचे ठरेल. व्यापारी वर्गाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. फाजील आत्मविश्वास टाळावा. मित्रांसोबत उत्तम काळ व्यतीत करू शकाल. 

सिंह : नवीन उद्योग धंदा सुरू करायला प्रवृत्त व्हाल. दुसऱ्याच्या मदतीकरिता स्वतःच्या पायावर उभे राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही असेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. व्यापारात वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आप्तेष्टांमुळे समस्या उद्भवू शकेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. 

कन्या : व्यसनांना वेळीच आळा घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची खबरदारी खबरदारी घ्या. उत्साहवर्धक दिवस. आर्थिक पातळीवरील प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. बोलण्यातील माधुर्यामुळे प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. कौटुंबिक संपत्तीत वाढीचे संकेत. आहारावर नियंत्रण ठेवा. अपचनाचा त्रास संभवतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

तुळ : महिलांनी कौटुंबिक सौख्य जपा. मित्रांशी तुटलेले संबंध पुन्हा जुळतील. व्यवसायातील समस्या संपुष्टात येऊ शकतील. जोडीदाराशी असलेले नातेसंबंध दृढ होऊ शकतील. मुलांच्या व्यापारातील गती मन प्रसन्न करेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. आर्थिक पातळीवर प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. 

वृश्चिक : जुनी उधारी वसूल होईल. दिवस आनंदात जाईल. रोजगाराच्या क्षेत्रातील प्रतिमा उजळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीचे मार्ग प्रशस्त होतील. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. विरोधक पराभूत होतील. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता. 

धनु : सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. आजारपण अंगावर काढू नका. संमिश्र घटनांचा दिवस. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहावे. छोटे प्रवास संभवतात. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. अन्यथा आर्थिक आघाडीवरील चिंतेत भर पडू शकेल. संयम आणि धैर्याने कौटुंबिक पातळीवरील प्रश्न हाताळावेत. परदेशात राहणाऱ्या नातेवाईक वा आप्तेष्टांकडून शुभ वार्ता मिळू शकतील. 

मकर : लोकांमध्ये दरवेळेस अनावश्यक आपले मत नोंदवू नका. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. मित्रांसोबत पर्यटनाचे बेत आखाल. कुटुंबातील सदस्यांकडून संपूर्ण सहकार्य लाभेल. एखादी व्यक्ती आपणाहून मदत करू शकेल. भावंडांसोबत उत्तम वेळ व्यतीत करू शकाल. 


कुंभ : नवीन कार्याला सुरुवात करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यशकारक दिवस. हाती घेतलेले काम वा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास जाऊ शकेल. पद, प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊ शकेल. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल. आरोग्यात सुधारणा दिसून य

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post