माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : नवरात्र आणि आगामी दिवाळीमध्ये दागिन्यांच्या विक्रीत वाढ होण्याच्या अंदाजाने सराफ व्यावसायिक आणि साठेबाजांनी सोने खरेदी वाढली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर (MCX) बुधवारी बाजार उघडताच सोने १३५ रुपयांनी वधारले आहे. सोन्याने ५१ हजारांची पातळी ओलांडली. आज सकाळी ९.०५ मिनटांनी सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१०४५ रुपये झाला. चांदीच्या दरात देखील ३६१ रुपयांची तेजी दिसून आली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३४८५ रुपये झाला आहे.
कमॉडिटी बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली होती. बाजार बंद होताना सोने २२६ रुपयांनी महागले. सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५०६८७ रुपयांवर बंद झाला. एक किलो चांदीचा भाव ६२०९५ रुपयांवर गेला. त्यात ९७० रुपयांची वाढ झाली.
सराफा बाजारात देखील स्पॉट गोल्ड ५०९७६ रुपये प्रती १० ग्रॅम इतके होते. तर चांदीचा भाव ६२१८७ रुपये प्रती किलो होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचा मंगळवारी करांव्यतिरिक्त शुध्द सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९७६ रुपये होता. २३ कॅरेटचा भाव ५०७७२ रुपये असून २२ कॅरेट (९१६) चा सोने दर ४६६९४ रुपये आहे. सोन्यावर वस्तू आणि सेवा कर तसेच घडणावळ मजुरी आकारली जाते. त्यामुळे दागिना खरेदी करताना त्यात किमान ४ ते ५ हजारांची वाढ होते.
सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या किती रुपयांनी घसरला सोन्याचा भाव
goodreturns या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९६४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०६४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३७९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१४०० रुपये आहे.चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५०९५० रुपये आहे.
डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.२८% नी उंचावले व ते १,९०४.३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. इतर चलनधारकांसाठी हा मौल्यवान धातू स्वस्त झाला. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नँसी पेलोसी यांनी आगामी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी नव्या कोरोना मदत निधीबाबत आशा कायम ठेवल्याने डॉलरचे मूल्य कमकुवत ठरले.
सोने हे महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन मानले जाते. कमी व्याजदरामुळे सोन्याने २०२० मध्ये २५% वृद्धी घेतली. जागतिक मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणावर तरलतेत प्रोत्साहन दिल्याने ही वाढ दिसून आली. यासोबतच, युरोपमध्ये कोरोना साथीमुळे पुन्हा निर्बंध लादले जात असून कोरोनाची जागतिक रुग्णसंख्या ४० दशलक्षपर्यंत गेल्याने सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणुकदारांचा कल दिसून आला.
Post a Comment