माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडत असले तर कंपन्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे मुंबईसह देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.
Post a Comment