माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. राज्यात मंदिर उघडण्याच्या मुद्यावरून कोश्यारी यांनी सर्व संकेत पायदळी तुडवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झाला आहात का? अशी विचारणा केली होती. त्यानंतर राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आज (ता.२१) मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावार येण्याचे टाळले आहे. मुंबईत पोलिस स्मृती दिन २०२० कार्यक्रमाला राज्यपालांना दांडी मारली. संकेतांप्रमाणे राज्यपाल या कार्यक्रमाला हजर राहणे अपेक्षिते होते. मुंबईत आज सकाळी सात वाजता नायगाव पोलिस मुख्यालयात 'पोलिस स्मृती दिन' कार्यक्रमात मानवंदना कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त उपस्थित होते.
Post a Comment