महाराष्ट्रात मुसळधार: पण वादळं पूर्व किनापट्टीवरच जास्त का?


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - चक्रीवादळ म्हणजे भारतावर होणा-या नैसर्गिक आपत्तींपैकी एक. भारताच्या ७५१७ कि.मी. किनारपट्टीच्या क्षेत्राला वर्षाकाठी जगातील उष्णकटिबंधीय क्षेत्राच्या दहा टक्के चक्रीवादळे धडकता. पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका अधिक आहे. याची ठाम वैज्ञानिक कारणे आहेत.

एनसीआरएमपी (नॅशनल सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट प्रोजेक्ट) नुसार, भारताच्या जीडीपीपैकी २ टक्के आणि केंद्र सरकारचा सुमारे १२ टक्के महसूल देशाच्या लांब किनारपट्टीवर आदळणा-या चक्रीवादळामुळे नष्ट झाला आहे. तसेच देशातील ३२ कोटीहून अधिक लोक चक्रीवादळाच्या धोक्यांमुळे असुरक्षित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येच्या जवळजवळ एक तृतीयांश आहे. पूर्व किना-यावर चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान केंद्रशासित प्रदेश पाँडेचरी व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या चार राज्यांत होते.

चक्रीवादळग्रस्त भागातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोक किनारपट्टीपासून १०० कि.मी. अंतरावर राहतात, असे एनसीआरएमपीने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. चक्रीवादळ सरासरी सुमारे ६२ कि.मी. वेगाचे वारे आणतात. १९८० ते २००० या कालावधीतील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की भारतातील सुमारे ३७० दशलक्ष लोक चक्रीवादळाने प्रभावित झाले. 

सर्वाधिक चक्रीवादळांचा कालावधी म्हणजे मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर. १९८० ते २००० या काळात भारताच्या किनारपट्टीवर सुमारे ३०८ चक्रीवादळे आली. या काळात फक्त ४८ चक्रीवादळांनी पश्चिम किनारपट्टीवर धडक मारली. पूर्व किनारपट्टीवर धडकणा-या चक्रीवादळांमुळे मोठ्या संख्येने मृत्यू, मालमत्ता व पायाभूत सुविधांचे नुकसान होते. 

एनसीआरएमपीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले सुमारे ५८ टक्के चक्रीवादळे पूर्व किनारपट्टीवर आदळून पुढे सरकतात. तर अरबी समुद्रामध्ये विकसित होणा-या चक्रीवादळांपैकी २५ टक्के चक्रिवादळे भारताच्या पश्चिम किना-याच्या दिशेने जातात. 

चक्रीवादळाच्या निर्मितीस समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि आर्द्रता हे सर्वात महत्वाचे घटक जबाबदार आहेत. बंगालच्या उपसागरात दिसणारा सरासरी पाऊस खूप जास्त आहे आणि म्हणूनच या प्रदेशात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यताही अनुरुप आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये सरासरी तापमान २८ डिग्री सेल्सिअस आहे. या प्रदेशातील नद्यांमधून खाडीत उबदार हवा आणि ताजे पाणी प्रवाहित होत अल्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते आणि परिणामी कमी दाबाचा पट्टा वाढतो.

इतर जलसंचयातून चक्रीवादळे बंगालच्या उपसागराद्वारे हस्तांतरित केले जातात. बंगालच्या उपसागरामध्ये भूपृष्ठांचा भाग खूपच कमी आहे. त्यामुळे या प्रदेशात उद्भवणारी चक्रीवादळे कमकुवत होत नाहीत आणि पूर्वेकडील किनारपट्टीकडे सहज आणि वेगाने पुढे सरकतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post