माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - यावर्षी बंगालच्या उपसागरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वारंवार तीव्र चक्रीवादळे निर्माण होणार आहेत. परिणामी हिवाळा ऋतूचा कालावधी वाढणार आहे. तसेच या हिवाळ्यादरम्यान कडाक्याची थंडीही असेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभाग (IMD) प्रमुख एम. महापात्र यांनी वर्तवली आहे. ते राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (कोल्ड वेव्ह रिस्क रिडक्शन) विषयावर आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते.
एम. महापात्र यांच्या माहितीनुसार, ला निना चक्रिवादळाची परिस्थिती निश्चित झाली आहे. हिवाळ्यामध्ये बंगालच्या उपसागरात वारंवार वेगाने ला नीना चक्रिवादळाची निर्मिती होऊ शकते. जे देशातील थंडीवर परिणाम करू शकेल. मात्र, इतरही बरेच घटक हिवाळ्यावर परिणाम करतात. हिवाळ्यातील महिन्यांसाठी नोव्हेंबरमध्ये एक अंदाज जारी केला जाईल. पण जर आपण फक्त ला निनाच्या परिणामाचा विचार केला तर ते नक्कीच हिवाळ्याशी जोडलेले आहे.
नवीन अंदाजानुसार, एसएसटी सर्वात थंड होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत ला नीना चक्रिवादळाची कमकुवत स्थिती मध्यम स्थितीमध्ये बदलू शकते. ही परिस्थिती पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत राहू शकते. थंडीच्या लाटेसाठी ला निना आणि एल निनोची परिस्थिती मोठी भूमिका बजावते. ला निना कमकुवत झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा थंडी अधिक होऊ शकते.
महापात्रा म्हणाले, 'ला नीनाची स्थिती कमकुवत असल्याने यावर्षी आपल्याला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लगेल. शीतलहरीच्या परिस्थितीसाठी जर आपण मोठ्या घटकाचा विचार केला तर एल निनो आणि ला निना मोठी भूमिका बजावतात. ला निना शीतलहरीसाठी अनुकूल तर अल निनोची उपयुक्त नाही.
ला नीना म्हणजे काय
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किना-यावर पेरू आणि इक्वाडोर दोन देश आहेत. येथील किना-यावर दक्षिणेनेपासून उत्तरेच्या देशेने हम्बोल्ट नावाचा थंड प्रवाह वाहतो. यादरम्यान विषुववृत्त वरून एक उबदार प्रवाह येतो आणि हम्बोल्टला मिळतो. सामान्य परिस्थितीत जेव्हा प्रवाह थंड असतो तेव्हा एक चक्र फिरते सायकल फिरते. हे शीत प्रवाह प्रशांत महासागराच्या पश्चिम किना-याकडे, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील किनारपट्टी, फिलिपिन्स इत्यादी ठिकाणी प्रवास करतात आणि पावसाला कारणीभूत ठरतात.
परंतु बर्याचदा पाच किंवा सहा वर्षांत, कोणत्याही कारणास्तव, गरम पाण्याचे प्रवाह येतात आणि थंड पाण्याचे प्रवाह काढून टाकतात. यामुळे तेथील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होते. तापमानात वाढ होण्याच्या या प्रक्रियेस 'एल निनो' म्हणतात. त्याची सुरुवात डिसेंबरच्या आसपास सुरू होते.
जेव्हा ‘एल निनो’ आगमन होते तेव्हा हे वादळ पेरू देशामध्ये जोरदार पाऊस पाडते. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे जाणार्या व्यापारी वा-यामध्ये पुरेसा ओलावा कमी होतो.
'एल निनो' च्या अगदी उलट आहे ते म्हणजे 'ला निना'. म्हणजेच पेरूमध्ये थंड पाण्याचा प्रवाह योग्यप्रकारे वाहत असल्यास ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्समध्ये चांगला पाऊस पडेल. भारतातील मान्सूनचा प्रवाह ऑस्ट्रेलियामधून वाहतो. कोरल परिणामामुळे ते विषुववृत्तापासून फिरते आणि भारतात पाऊस आणतो. यामुळे पावसाळा चांगला होतो. तसेच मुसळधार पाऊस पडतो.
एल निनो हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ इशु शिशु आहे. ला निना हा देखील एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ एक लहान मुलगी असा आहे. यावर्षी २०२० मध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला. आकडेवारीचा विचार केला तर यंदा ९ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक मृत्यू उत्तर भारतात घडतात
महापात्रा म्हणाले की, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार ही अशी राज्ये आहेत जिथे शीतलहरीमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आयएमडी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये या शीतलहरीचा अंदाजदेखील जारी करते आणि डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान याबाबतच्या परिस्थितीविषयी माहिती देते.
‘हे’ घटक पावसाळ्यावर परिणाम करतात....
ला निना प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या थंड पाण्याशी संबंधित आहे, तर एल निनो त्याच्या उष्णतेशी संबंधित आहे. या दोन्ही घटकांचा भारतीय मान्सूनवरही प्रभाव असल्याचे समजते. उदाहरणार्थ, २०२० मध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि यावर्षी सरासरी नऊ टक्के जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी हिवाळ्याच्या हंगामात शीतलहरीचा कालावधी अधिक होता.
अल निनो दक्षिणी ऑसिलिएशन बुलेटिनमध्ये हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्यातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार एक्वाटोरियल पॅसिफिक आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तपमानावर ला निनाची स्थिती सध्या कमकुवत आहे. तर, मध्य आणि पूर्वेकडील विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या क्षेत्रावर सामान्यापेक्षाही कमी आहे.
Post a Comment