नगर जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५.१४ टक्के



 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यातील 541कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 918  झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 95.14 टक्के झाले आहे. उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 1 हजार 788 झाली आहे.

जिल्ह्यात काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये नगर शहर 115, अकोले 33, जामखेड 23, कर्जत 21, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 36, नेवासे 26, पारनेर 33, पाथर्डी 36, राहाता 32, राहुरी 15, संगमनेर 52, शेवगाव 14, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 31, भिंगार 11, मिलिटरी हॉस्पिटल 10, इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात काल 219 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 26, खासगी प्रयोगशाळेत 11 आणि अँटीजेन चाचणीत 182 रुग्ण बाधित आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर 13, जामखेड 1, कर्जत 1, नगर ग्रामीण 2, नेवासा 1, पाथर्डी 2, राहुरी 1, संगमनेर 1, श्रीरामपूर 4 रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये  नगर शहर 8 आणि श्रीगोंदा 3 रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 182 जण बाधित आढळून आले. यामध्ये नगर शहर15, अकोले 20, जामखेड 10, कर्जत 13, कोपरगाव 4, पारनेर 13, पाथर्डी 29 रुग्णांचा समावेश आहे.





0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post