माय अहमदनगर वेब अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून आजपासून सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजेनंतर त्यांना प्रवास करता येणार असल्याची परवानगी रेल्वेमंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने राज्यात अनलॉकची घोषणा केल्यानंतर मर्यादित प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर राज्याचे तसे पत्र आल्यानंतर त्यावर रेल्वेमंत्रालयाने तातडीने सकारात्मक निर्णय़ घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी ट्विट करीत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रेल्वे प्रवासास परवानगी देण्याची रेल्वेची नेहमीच तयारी होती. महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या पत्रावर तात्काळ निर्णय घेण्याच आला असून आता 21 ऑक्टोबरपासून सर्व महिला प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. महिला प्रवासी सकाळी 11 ते दुपारी 4 आणि सायंकाळी 7 वाजेनंतर लोकल प्रवास करून शकतील, असेही गोयल यांनी म्हटले आहे.
Post a Comment