आयपीएलमध्ये सहा वर्षांनी इतिहास घडला!

 


माय अहमदनगर वेब टीम

दुबई - आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी सामना काल (ता.१८) रंगला. किंग्ज इलेव्हन पंजाबने बलाढ्य मुंबईला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नमवत विजय प्राप्त केला.  सुपर ओव्हरमध्ये मयांक अग्रवालने  फिल्डिंग करताना षटकार अडवत आणि फलंदाजी करतानाही दोन चौकार ठोकत पंजाबला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून दिला

सामन्यात प्रथम फलंदाजी करत मुंबईने 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. पंजाबचा संघही 20 षटकांत 6 षटकांत 176 धावा करू शकला. अखेरच्या षटकात पंजाबने विजयासाठी 9 धावा करायच्या होत्या, पण ख्रिस जॉर्डन अंतिम चेंडूवर धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला.

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा सुपर ओव्हरही टाय झाली. दुसर्‍या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईला पराभूत केले. दोन्ही संघांनी पहिल्या सुपर षटकात 5-5 धावा केल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पंजाबला 12 धावांचे लक्ष्य दिले. पंजाबने ख्रिस गेलच्या षटकाराने आणि मयंक अग्रवाल चौकारांनी जिंकला. यापूर्वी २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळलेला सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाला. त्यावेळी दोन सुपर षटकांचा नियम नव्हता. राजस्थानने सुपर ओव्हरमध्ये अधिक चौकारांच्या जोरावर हा सामना जिंकला होता. 

गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्डकपच्या फायनलमध्येही असाच थरार न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये रंगला होता. ती फायनल सुद्धा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेली होती, तथापि ही ओव्हरसुद्धा टाय झाल्याने अधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. न्यूझीलंडची झालेली निराशा त्यावेळी लपून राहिली नव्हती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post