हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, रवीना टंडनने ब्युटी टिप्ससह सांगितली योग्य पद्धत




माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांचा भरपूर सामना करावा लागतो. थंडीमध्ये त्वचा कोरडी होणे, ओठ-त्वचा फाटणे, केस कोरडे होणे इत्यादी त्रास होऊ लागतात. आपल्या त्वचा, केस आणि शरीरावर थंड वातावरणाचे परिणाम स्पष्टपणे दिसतात. हिवाळ्यात आपली त्वचा अतिशय निर्जीव, निस्तेज आणि कोरडी होते. वातावरणातील तापमान घटू लागताच आपल्या शरीरातील ओलावा देखील कमी होण्यास सुरुवात होते.

हिवाळ्यात आपल्या त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननं काही खास नैसर्गिक टिप्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. थंडीच्या दिवसांत कोरड्या त्वचेची समस्या कशी दूर करावी, यासंदर्भातील माहिती तिनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे सांगितली. 

​हिवाळ्यात आंघोळ करण्याची योग्य पद्धत


थंडीमध्ये त्वचा केसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी ब्युटी केअर रुटीन योग्य पद्धतीने फॉलो करणं गरजेचं आहे. हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत रवीनाने व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘थंड हवामानात आंघोळ करताना साबणाचा जास्त प्रमाणात वापर करू नये. तसंच त्वचेसाठी सौम्य ऑर्गेनिक साबणाचा वापर करावा. जेणेकरून तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही’.



ऐका रवीना टंडननं सांगितलेला उपाय

View this post on Instagram
A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on Oct 14, 2020 at 7:22am PDT
​अशा पद्धतीने टॉवेलने अंग पुसावे


आंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलचा कसा वापर करावा, याचीही योग्य पद्धत रवीनाने समजावून सांगितली आहे. रवीनाने सांगितलं की 'आंघोळीनंतर टॉवेलच्या मदतीने अगदी हलक्या हाताने अंग पुसावे, आपली त्वचा टॉवेलनं कधीही रगडू नये’.



​त्वचेला मॉइश्चराइझर लावण्यास विसरू नका


त्वचेला मॉइश्चराइझर लावणे हा स्किन केअर रुटीनमधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. रवीनाने आपल्या चाहत्यांना सांगितले की, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कच्च्या आणि शुद्ध दुधाचा वापर करू शकता. मऊ कापडाच्या मदतीने कच्चे दूध आपल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांसाठी कच्चे दूध त्वचेवर राहू द्यावे.

​हेअर केअर टिप्स


रवीना टंडनने यापूर्वीही सोशल मीडियावर नैसर्गिक - घरगुती ब्युटी टिप्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. गेल्या वेळेस तिनं केसगळती समस्या कमी करण्यासाठी आवळ्याचं हेअर मास्क कसे तयार करायचे, याची पद्धत सांगितली होती.

(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी? अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला नैसर्गिक उपाय)
केसगळतीची कारणे व त्यावरील उपाय

View this post on Instagram
A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on Sep 16, 2020 at 8:06am PDT
​आवळ्याचे हेअर मास्क


आवळ्याचे हेअर मास्क तयार करण्यासाठी कपभर दुधामध्ये जवळपास ६ आवळे उकळून घ्या. आवळे नरम झाल्यानंतर मॅश करा. यानंतर मॅश केलेले आवळे आपल्या मुळांसह केसांना लावा.


१५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर शॅम्पूने केस धुण्याची आवश्यकता नाही. कारण या हेअर मास्कमुळे केस-टाळूवर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते, असेही रवीनानं सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post