माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - करोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ( IMF ) भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी दिलीय. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पुढच्या वर्षी चांगली असेल, असा अंदाज नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
सध्याचं आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. २०२१ मध्ये सर्व काही ठीक होईल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( IMF ) च्या नव्या अंदाजातून या गोष्टी समोर आलीय. या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ९.६ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज गेल्या आठवड्यात जागतिक बँकेनं वर्तवला होता. या व्यतिरिक्त मूडीजसह अनेक बड्या रेटिंग एजन्सी आधीच जीडीपीमध्ये घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.
१०.३ टक्के घसरण
करोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला असून या वर्षात १०.३ टक्क्यांनी जीडीपी घसरेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तवला आहे. २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८.८ टक्क्यांनी वाढेल, अशी आशा आयएमएफ व्यक्त केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर केंद्राचा धमाका; मोठं पॅकेज जाहीर
ऑनलाइन पैसे पाठवताय ; डिसेंबरपासून 'ही' सेवा २४ तास सुरु होणार
जागतिक अर्थव्यवस्थेत ४.४ टक्के घट
चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल. त्याचवेळी २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांच्या भक्कम वाढीसह ती पुढे जाईल, असा अंदा आयएमएफचा ताजा अहवाल आहे. जगातील बड्या अर्थव्यवस्थांमध्ये चीन हा एकमेव देश असेल ज्याच्या आर्थिक विकादरात यदांच्या वर्षात १.९ टक्के वाढ नोंदवली, असंही आयएमएफने म्हटलंय.
Post a Comment