माय अहमदनगर वेब टीम
हेेल्थ डेस्क - कोणत्याही फळांमध्ये बी ही असतेच असते. मात्र, केळं हे असं एकमेव फळ आहे, ज्यात बी नसते. त्यामुळे सर्वात जुनं बिनबियांचं फळ म्हणून केळं ओळखलं जातं. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसंच केळ्यापासून वेफर्स, केळ्याची कोथिंबीर, शिकरणं असे अनेक पदार्थ केले जातात. यासोबतच केळी खाण्याचे अनेक शारीरिक फायदेदेखील आहेत. साधारणपणे केळी खाण्याचे फायदे साऱ्यांनाच ठावूक असतील. मात्र, त्याच्या इतकीच त्याची फूले म्हणजेच केळफुलदेखील तितकंच गुणकारी आहे. त्यामुळे केळफूल खाण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
केळफुलाचे फायदे
१. केळफूलाची भाजी ही अत्यंत पौष्टिक व सकस आहार आहे. त्यामुळे लहान मुलांनी आवर्जुन ही भाजी द्यावी.
२. केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर होतात.
३. केळफुलामुळे हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते.
४. मासिक पाळीच्या काळात अति रक्तस्राव होत असल्यास केळफुलाची भाजी खावी.
५. मासिक पाळीतील वेदनादेखील दूर होतात.
६. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Post a Comment