“गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली




माय अहमदनगर वेब टीम

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांच्या या कृतीवर अभिनेत्री कंगना रणौत हिने संताप व्यक्त केला. आता कळलं का संपूर्ण जगासमोर इभ्रतीचे वाभाडे निघाल्यावर कसं वाटतं? असा सवाल तिने कोर्टाचा दरवाजा ठोठावणाऱ्या कलाकारांना केला आहे.

“बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली. अन् त्याचमुळे आज एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय. याचाही सर्व हिशेब माझ्याकडे आहे.” अशा आशयाची दोन ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post