माय अहमदनगर वेब टीम
प्रेग्नेंसीमध्ये गर्भातील बाळाला आवश्यक ते पोषक तत्वं प्रदान करण्यासाठी ह्रदयाला खूप मेहनत करावी लागते. गर्भावस्थे दरम्यान शरीरातील रक्ताची पातळी ३० ते ५० टक्क्यांनी वाढते. गर्भावस्थेमध्ये रक्ताची पूर्तता होण्यासाठी आणि हिमोग्लोबिनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास प्रेग्नेंसी मधील एनीमिया होण्याची शक्यता असते. ऐन गरोदरपणात हिमोग्लोबिन कमी झाल्यास त्या स्त्रीला थकवा, चक्कर, मुदतपूर्व प्रसुती, बाळाची खुंटलेली वाढ, अशक्त बाळ जन्माला येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या लोहाने परिपूर्ण असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी डायटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरुर करावा. कारण हिमोग्लोबिन कमी असल्यास लोहयुक्त आहार भरपूर लाभदायक ठरतो. लोह हिमोग्लोबिन बनवण्यासाठी मदतशील ठरतात. हिमोग्लोबिन शरीरात लाल रक्तपेशीं बनवण्याचे काम करते. पालक, केळी, ब्रोकोली, कोथिंबीर, पुदीना, मेथी दाणे हे पदार्थ आयरनयुक्त असतात. तर हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोहाव्यतिरिक्त व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्वं देखील असतात.
Post a Comment