माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - 'स्वामित्व योजना गावांतील ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत रविवारी पंतप्रधांनाही विरोधकांना धारेवर धरले. गेल्या अनेक दशकांपासून सत्ताधाऱ्यांनी मोठमोठी आश्वासने देत गाव आणि ग्रामस्थांना समस्यांच्या गर्तेत ढकलले. पंरतू, आता असे होणार नाही. ग्रामस्थांच्या आर्शिवादाने गाव, गरीब, दलित, पीडित, शोषित,वंचितांसाठी जेवढे करता येईल तेवढी चांगली कामे केले जातील, असे आश्वासन पंतप्रधांनाही दिले. पंतप्रधानांच्या हस्ते आज, ग्रामीण भागासाठी सुरु करण्यात आलेल्या ''स्वामित्व येाजने' अंतर्गत मालमत्ता कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी शेती सुधारणा कायद्यांना होणाऱ्या विरोधासंबंधी पुन्हा एकदा विरोधकांवर शरसंधान साधले.
स्वामित्त योजनेमुळे देशातील एक लाख कुटुंबीयांना योजनेचा लाभ मिळाला आहे. मालमत्ता मिळाले कुटुंबीयांसाठी आजची संध्याकाळ बरीच आनंददायक ठरेल. ही नवीन स्वप्न बघण्याची वेळ आहे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना विविध राज्यातील लाभार्थ्यांना संवाद साधला. महाराष्ट्रातील लाभार्थी विश्वनाथ यांच्यासोबत त्यांनी संवाद साधत गावातील लोक खुश आहेत का? असा सवाल विचारला. मालमत्ता कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुरु असल्याने गावात आनंदाचे वातावरण असल्याचे उत्तर त्यांना विश्वनाथ यांच्याकडून मिळाले. भौतिक दुरत्वाचे पालन करीत हातांना नियमित स्वच्छ करून मास्क घालावे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचा पुनर्रोच्चार पंतप्रधानांनी केला.
शेती सुधारणा कायद्यावरुन विरोधकांवर टिकास्त्र
शेतकरी,शेतमजूरांना मिळणाऱ्या विमा, पेंशन सारख्या सुविधांमुळे ज्यांना त्रास होत आहे. ते आज शेती सुधारणांच्या विरोधात आहेत. पंरतू, देशाने गाव आणि गरीबांना आत्मनिर्भर बनवण्याचा निश्चय केला आहे.
हे देशाच्या सामर्थ्यांची ओळख आहे. या संकल्प सिद्धीसाठी सामित्व योजनेची भूमिका बरीच महत्वाची आहे. छोटे शेतकरी, पशुसंवर्धक, मासेमारांना किसान क्रेडिट कार्ड मिळाल्याने ज्यांच्या काळा कमाईचे मार्ग बंद झाला आहे. त्यांनाच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरियाच्या नीमकोटींगमुळे ज्यांची बेकायदेशीर कमाई बंद झाली, शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट पैसे मिळत असल्याने ज्यांना त्रास होत आहे. ते आज अस्वस्थ असल्याचे मोदी म्हणाले. ग्रामस्थांना गरीबाच्या गर्तात ढकलून काहींनी राजकीय आधार मिळवला. भूतकाळातील गरीबी उन्मुलनाच्या अभियानाचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
सबका साथ सबका विकास !
अनेक दशकांपर्यंत गावातील कोट्यवधी कुटुंबियांकडे त्यांचे स्वत:चे घर नव्हते. आज गावातील जवळपास २ कोटी कुटुंबियांना पक्के घरे मिळाली आहेत. स्वामित्त योजनेमुळे ग्राम पंचायतींचे नगर पालिका तसेच नगर परिषदांप्रमाणे व्यवस्थापन सुलभ होईल. सहा दशकांपर्यंत गावातील कोट्यवधी ग्रामस्थ बँक खाते, शौचालय,गॅस कनेक्शन पासून वंचित होते. आज प्रत्येकांकडे बँक खाते, प्रत्येक घरात गॅस जोडणी तसेच शौचालय उभारण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षात ग्रामीण भागातील उणीवांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांचा विकास केला जात आहे. संपूर्ण पारदर्शकतेने सर्वांना योजनेचा लाभ मिळत असल्याचा दावाही पंतप्रधानांकडून करण्यात आला.
कर्ज मिळवण्याचा मार्ग सुकर
स्वामित्त योजनेतून गावातील तरुणांना कर्ज मिळवणे सुलभ झाले आहे. मालमत्तेवर मिळालेल्या अधिकारामुळे आत्मविश्वास बळावतो. संपत्तीवरील अधिकारामुळे गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होतो. कर्ज मिळणे सुकर झाल्याने रोजगार-स्वरोजगार निर्मिती होईल. जमीन-घरावरील मालकी हक्काचा देशाच्या विकासात मोठी भूमिका असते असेही ते म्हणाले.
जे.पी. नानाजी देशमुखांना अभिवादन
ग्रामस्थांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य जयप्रकाश नारायण तसेच नानाजी देशमुखांनी केले. या दोन्ही भारत रत्नांची केवळ जयंतीच एका तारखेला येत नाही, तर त्यांचा संघर्ष तसेच आदर्श देखिल एकसारखे आहेत. गावातील लोक जोपर्यंत वादविवादात अडकून राहतील तोपर्यंत ते स्वत: सह समाजाचा विकास करु शकणार नाही, असा विचार नानाजींचा होता. स्वामित्त योजनेमुळे देशातील गावातील अनेक वाद समाप्त करण्याचे एक मोठे माध्यम आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
लाभार्थ्यांना शुभेच्छा
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या निमित्ताने देशाने एक मोठे पाउल टाकले आहे. स्वामित्त योजना, गावात राहणारे बंधू-भगिनींना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करेल. हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, म
Post a Comment