अंकिताच्या ‘सवार लूं’ गाण्यावरील डान्सने चाहत्यांना लागला ‘करंट’

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलीवूड आणि मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अंकिताने फिकट शेवाळी रंगाची साडी परिधान करत लुटेरा या चित्रपटातील 'संवार लूं' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. सध्या तिने शेअर केलेल्या या डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला लुटेरा चित्रपटातील ‘सवार लू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने खास कॅप्शनदेखील दिली आहे. 'साडी डान्स आणि सुंदर म्युझिक, काय संयोग आहे' असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

तिचा या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली आहे. दोन दिवसापूर्वी अंकिताने मराठमोळ्या वेशभूषेतील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यामध्ये तिने मराठमोळ्या दागिन्यांचा वापर करत हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. अंकिताने मराठमोळं प्रेम, दागिने, मराठमोळे पदार्थ, मराठमोळी वधू अशी कॅप्शन देत हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post