माय अहमदनगर वेब टीम
दुबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडीजचा फलंदाज निकोलस पूरनचे कौतुक केले. तेंडुलकरनुसार पूरनची बॅकलिफ्ट आणि स्टान्स पाहून त्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जे पी ड्युमिनीची आठवण होते. पूरनने मंगळवारी अर्धशतक झळकावत किंग्स इलेव्हन पंजाबला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून दिला. पूरनने 28 चेंडूत 53 धावा केल्या.
सामना संपल्यानंतर तेंडुलकरने ट्विट केले की, निकोलस पूरनने आपल्या खेळीत काही चांगले फटके मारले. त्याचा बॅकलिफ्ट आणि स्टान्स पाहून मला ड्युमिनीची आठवण होते.
Post a Comment