भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले 'आयटम' ; कमलनाथांची जीभ घसरली

 


माय अहमदनगर वेब टीम

भोपाळः बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये पोटनिवडणूक सुरू आहे. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष आहे. पण पोटनिवडणुकीतील प्रचारसभेदरम्यान कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ ( kamal nath ) यांनी भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल असभ्य भाषेत टीका केलीय. यामुळे कमलनाथ हे वादात सापडले आहेत. भाजपनेही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

कमलनाथांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले 'आयटम'

मध्य प्रदेशातील डबरा येथील कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी कमलनाथ आले होते. यावेळी कमलनाथ यांनी प्रचारसभेत भाषण केलं. 'सुरेंद्र राजेश हे आमचे उमेदवार आहेत. ते चांगल्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाही, काय नाव त्यांचे? (इम्रती देवी, माजी राज्यमंत्री) मी काय त्यांचं नाव घेऊ. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवं होतं. 'ही काय आयटम आहे', असं कमलनाथ म्हणाले.

Previous Post Next Post