महिंद्राची कार खरेदीची जबरदस्त संधी, ३.०६ लाखांपर्यंत डिस्काउंट

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्लीः महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी दिवाळी आधी या महिन्यात आपल्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर करीत आहे. या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच कंपनी अॅक्सेसरीज वर ३००० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करीत आहे. परंतु, यासाठी तुम्हाला महिंद्राची कार ऑनलाइन बुक करावी लागणार आहे. कंपनीने नुकतीच लाँच केलेली महिंद्रा थार वर कोणताही डिस्काउंट ऑफर केलेला नाही. 

Mahindra Alturas G4 वर ३.०६ लाख 

महिंद्राच्या या कारवर ३.०६ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट कंपनी या महिन्यात ऑफर करीत आहे. फुल साइज एसयूव्ही सेगमेंट मध्ये ही कार सर्वात स्वस्त कार आहे. कारवर या महिन्यात २.२ लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर करीत आहे. 

महिंद्रा KUV100 NXT वर ६२ हजार रुपये

महिंद्राच्या या कारवर ऑक्टोबर महिन्यात ६२ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. डिझाईन आणि सिटिंग कंफिग्यूरेशन मध्ये ही कार सर्वात वेगळी आहे. या कारवर सध्या ६२ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. 

महिंद्रा XUV500 वर ५७ हजार रुपये 

कंपनीने २०११ मध्ये लाँच केलेल्या या कारवर ५७ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. कंपनी या कारला फेसलिफ्ट २ वेळा अपडेट केलेले आहे. कंपनी पुढील वर्षी या कारचे न्यू जनरेशन मॉडल लाँच करणार आहे. या महिन्यात कारच्या खरेदीवर ५७ हजार रुपयांची बचत करता येवू शकते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post