मुंबई - झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर ही मालिकेतील नंदिता गायकवाड उर्फ वहिनीसाहेब या पात्रामुळे सर्वांच्या घराघरात पोहचली. मालिकेत वहिनीसाहेब म्हणुन पसिद्धी मिळवलेल्या या लाडक्या अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी गोड बातमी आणली आहे.
धनश्री काडगावकर आणि दुर्वेश देशमुख यांच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. या दोघांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. ही गोड बातमी दोघांनी एका अनोख्या पद्धतीने शेअर केली आहे. आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत धनश्रीने आपण आई होणार असल्याचे धनश्रीने जाहिर केले आहे.
गीता गोविंदम या तमिळ चित्रपटातील "इंकेम इंकेम'' या प्रसिद्ध गाण्याचे संगीत देत धनश्रीने बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्यावर स्त्रीच्या आयुष्यात जे बदल होतात. ते बदल, तो आनंद या व्हिडिओतून शेअर केला आहे.
धनश्रीने ही गोड बातमी सांगितल्यानंतर साऱ्यांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्येक कलाकाराने तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिला आहे. धनश्री शेअर केलेला हा व्हिडिओ खूप खास आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदाच कुणी आपली गोड बातमी शेअर केली आहे.
Post a Comment