कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या



माय अहमदनगर वेब टीम

 गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२०. चंद्र धनु राशीत विराजमान असेल. अन्य ग्रहांच्या स्थितीचा विचार केल्यास सिंह राशीच्या व्यक्तींना दिवस खर्चिक ठरू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया... 

आजचे मराठी पंचांग : गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२० 

मेष : आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल. अधिक काम पडेल. ग्रहमानाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास धावपळ संभवते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येऊन हाती घेतलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. विश्वासाला पात्र ठरण्याचे आपले वैशिष्ट्य प्रकर्षाने दिसून येईल.

वृषभ : घाईने निर्णय घेऊ नयेत. नवीन कार्यारंभास अनुकूल दिवस नाही. स्पर्धक आपल्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतील. सारासार विचार केल्यानंतरच एखादा निर्णय घेणे हितकारक ठरेल. हळूहळू यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. कुटुंबाला प्राधान्य द्यावे. आनंदाची अनुभूती घ्याल. 

मिथुन : व्यवसायिकांना यशकारक दिवस. मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. आर्थिक पातळी संतुलित असू शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. एकूणच दिवस सामान्य असेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. मित्रांच्या भेटी-गाठी संभवतात. आठवणींना उजाळा द्याल. 

कर्क : विवाहाची बोलणी पुढे सरकतील. समाजातील मान, सन्मान वाढेल. चांगल्या कामातील आवड वाढीस लागेल. आजचा दिवस शुभ ठरू शकेल. एखादा महत्त्वाच्या निर्णय घेऊ शकाल. त्याचा भविष्यात लाभ होईल. जनसंपर्कात भर पडेल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहील. 

सिंह : प्रवास संभवतात. भाग्याची साथ लाभेल. संवादाने प्रश्न सुटू शकतील. विरोधक परास्त होतील. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. चांगल्या गोष्टींसाठी खर्च होऊ शकेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळखी मित्रत्वात परिवर्तित होऊ शकतील. कौटुंबिक कामासाठी प्रवास करावा लागू शकेल. 

कन्या : चांगल्या कामासाठी खर्च होईल. प्रलंबित येणी वसूल होऊ शकतील. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. मानसिक शांतता लाभेल. हितशत्रू परास्त होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मित्रांच्या मदतीमुळे कामे मार्गी लागू शकतील. दिवसाचा उत्तरार्ध गप्पा-गोष्टी, मौज-मजेत व्यतीत होऊ शकेल. 

तुळ : जास्त मेहनत घ्यावी लागेल. हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. दिवस काहीसा आव्हानात्मक ठरू शकेल. मेहनत जास्त आणि मोबदला कमी अशी स्थिती असू शकेल. धावपळ करावी लागू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. कुटुंबासाठी घेतलेला निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकेल. 

वृश्चिक : वरिष्ठांकडून कौतुक, प्रशंसा होईल. आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्यात यश मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी दिवस. एखादा महत्त्वाचा करार पूर्ण होऊ शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. 

धनु : एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल. कामे सुरळीत पार पडल्याने मन प्रसन्न होईल. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे दिवस शुभ ठरू शकेल. धनलाभाचे उत्तम योग जुळून येऊ शकतील. आरोग्यात सुधारणा होईल. विरोधकांवर विजय प्राप्त करू शकाल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च झाल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. 

मकर : समस्यांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. आजचा दिवस शुभ फलदायक ठरेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पार पडतील. सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. मालमत्ता, जागांसदर्भातील वाद संपुष्टात येऊ शकतील. 

कुंभ : गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरी-व्यापारात महत्त्वाचा निर्णय घ्याल. आजचा दिवस यशकारक ठरू शकेल. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. आपण घेत असलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू शकेल. सुख, समृद्धी वृद्धिंगत होऊ शकेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भावंडांशी असलेला वाद मिटू शकेल. 

मीन : व्यवसायातील गुंतवणूक लाभदायक ठरेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. ग्रहमानाच्या अनुकूलतेमुळे भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. धन, धान्य वृद्धिंगत होईल. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post