माय अहमदनगर वेब टीम
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये दहावी, बारावी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी परीक्षांची शक्यता धूसर झाली होती. मात्र, मंडळाने या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 20 ऑक्टोबरपासून परीक्षेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून आता परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान दहावी, 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान दरम्यान बारावी तर 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान दरम्यान बारावी व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात येणार आहे.
यंदा दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तरीदेखील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे निकालानंतर पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकाकडे लक्ष असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील दहावी,बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या, श्रेणीसुधार तसेच एटीकेटीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार होत्या.परंतु कोरोना प्रादूर्भावामुळे संबंधित परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या.पंरतु आता मात्र या परीक्षा घेण्यासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत परीक्षा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या राज्य मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली आहे.
संभाव्य वेळापत्रक
दहावी लेखी परीक्षा - 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
बारावी लेखी परीक्षा - 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
बारावी व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा - 20 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर
दहावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - 18 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
बारावी - प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा - 18 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
Post a Comment