मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव : गोपीचंद पडळकर

 


माय अहमदनगर वेब टीम

नाशिकरोड - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात उद्धव सरकार अपयशी ठरले, ते झाकण्यासाठी सद्या महाराष्ट्रातील सरकार मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पडळकर रविवारी ( ता.११ ) नाशिक जिल्हा धनगर समाज आरक्षणाच्या बाबत ते कार्यकर्तासोबत सवांद साधण्यासाठी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले की, पूर्वीच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरू केलेल्या २२ योजना विद्यमान सरकारने बंद ठेवल्या आहेत. राज्यात उद्धव सरकार सत्तेत आले तेव्हा जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आजच्या स्थितीत जनतेचा अपेक्षा भंग झाला आहे. कोविड, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी सर्वच स्तरावर सरकार अपयश ठरलेलं आहे. गोंधळलेला सरदार अन त्याचे सैन्य अशी अवस्था उद्धव सरकारची झालेली दिसते. हरियाणा सरकारने धनगर समाजाला एसटीत आरक्षण दिले, ते टिकवले. त्याप्रमाणे उद्धव सरकारने राज्यातील धनगरांना एसटी मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी यावेळी केली.

मेंढपाळांना अट्रोसिटीचा अधिकार द्यावा  

औरंगाबाद जिल्ह्यातील भोकरदन येथे शेतात मेंढ्या चरायला घेऊन आला म्हणून एका मेंढपाळाला ट्रॅक्टरखाली घालून मारले, भविष्यात यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी सरकारने मेंढपाळाना अट्रॉसिटी दाखल करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी आमदार पडळकर यांनी यावेळी  केली.

मेंढपाळाना दहा लाखांचे अनुदान हवे

मेंढपाळ हा व्यवसाय असून शासनाने त्यांना दहा लाख रुपये अनुदान दिले पाहिजे. एकीकडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार करणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. दुसरीकडे वणवण भटकणाऱ्या मेंढपाळाबाबत शासन उदासीन आहे. त्यांना दहा लाख रुपयांचे अनुदान द्यायला हवे, असे आमदार पडळकर यांनी म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post