माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - १९८३ साली भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कपिल देव यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्यरात्री १ वाजता कपिल देव साऊथ दिल्लीमधील ओखला भागात असलेल्या फोर्टीस रुग्णालयात छातीत दुखत असल्यामुळे तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर रात्री कपिल देव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली.
६१ वर्षीय कपिल देव अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचनही करत असतात. आपल्या १६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कपिल देव यांनी १३१ कसोटी आणि २२५ वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या काळातले सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख असलेल्या कपिल देव यांचा भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा उचलला होता.
कसोटी कारकिर्दीत ५ हजार २४८ धावा आणि ४३४ बळी, वन-डे क्रिकेटमध्ये ३ हजार ७८३ धावा आणि २५३ बळी अशी बहारदार कामगिरी कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत केली. १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी नाबाद १७५ धावा करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.
Post a Comment