चंद्र मिथुन राशीत विराजमान होईल. बुध मिथुन राशीचा स्वामी आहे. चंद्राच्या प्रवेशाचा मिथुन राशीच्या व्यक्तींना शुभ लाभ मिळू शकेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घेऊया...
आजचे मराठी पंचांग : गुरुवार, ०८ ऑक्टोबर २०२०
मेष : आपल्या कला-गुणांना वाव मिळेल. जोडीदाराबरोबर सर्व गोष्टी शेअर करा. आहारावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. कार्यालयात हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात लाभ मिळू शकतील. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न होईल.
वृषभ : आपल्या शांत स्वभावाचा लोकांना फायदा घेऊ देऊ नका. कौटुंबिक स्थिरता मिळेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. दिवसभर ऊर्जा आणि सकारात्मकतेमुळे उत्साहात कार्यरत राहाल. विद्यार्थ्यांना समस्याकारक दिवस. आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. व्यापारी वर्गाला नव्या संधी प्राप्त होऊ शकतील.
मिथुन : पैशाची गुंतवणूक लोकांच्या भरवशावर करू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. नवीन ओळखी भविष्यात व्यवसाय विस्तारीकरणासाठी लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. पालकांची सेवा करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक संपत्ती वृद्धिंगत होऊ शकेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
कर्क : घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. बरोबर वाटणाऱ्या निर्णयला आपला मुद्दा स्पष्ट मांडा. आपल्या कामामुळे कार्यलयीन सहकारी प्रभावित होतील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कायदेशीर वाद संपुष्टात येऊ शकतील. विद्यार्थ्यांना लाभदायक दिवस. आप्तेष्टांमधील आपली प्रतिमा सुधारेल. भावंडांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कीर्ती वृद्धिंगत होईल.
सिंह : अपेक्षित उत्तराची दिशा सापडेल. अनके कामात गुंतून रहाल. आजचा दिवस अतिशय व्यस्त राहू शकेल. व्यापारी वर्ग आणि नोकरदार वर्गाच्या प्रयत्नांना यश येईल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. गुंतवणुकीतून लाभ शक्य. बचतीच्या योजना मार्गी लागतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य आणि सानिध्य लाभेल. कौटुंबिक वातावण आनंदी व उत्साही राहील. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडाल.
कन्या : आवश्यक नसताना छोटे प्रवास घडतील. समोरच्या व्यक्तीशी वाद घालणे टाळा. दिवसाच्या सुरुवातीला काही ना काही लाभ मिळू शकतील. एखाद्या विशेष व्यक्तीच्या संपर्कामुळे अनेक कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. शुभवार्ता मिळू शकतील. जमिनीची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यापारात नवीन करार लाभदायक ठरतील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे.
ऑक्टोबरमधील 'हे' अद्भूत व दुर्लभ योग ठरतील अत्यंत शुभ लाभदायक
तुळ : छोटे वाटणारे आजार अंगावर काढू नका. नोकरीत शांतपणे व्यवहार करा. उत्साह आणि सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात होईल. आर्थिक आघाडी दिलासादायक ठरू शकेल. विशेष व्यक्तीशी झालेली ओळख व्यवसायात लाभदायक ठरू शकेल. अनुभवी व्यक्तीच्या मदतीमुळे मोठी समस्या दूर होऊ शकेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरू शकेल. मुलांच्या विवाहविषयक चिंता मिटतील.
वृश्चिक : नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला आवश्यक घ्या. खेळाडूंना उत्तम काळ. कार्यक्षेत्रात घेतलेली अधिकची मेहनत लाभदायक ठरू शकेल. मान, सन्मान प्राप्त होतील. वर्तणूक उत्तम ठेवल्याचा फायदा होऊ शकेल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकाल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस.
धनु : मानसिक आरोग्य मजबूत करून ठेवा. लोकांच्यामध्ये प्रशंसा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिवस. समाजपयोगी कार्यांमुळे कीर्ती वृद्धिंगत होईल. व्यापारात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला लाभदायक ठरू शकेल. व्यापार विस्तारासाठी अधिक खर्च करावा लागू शकेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात नियोजन व व्यवस्थापनामुळे हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण कराल.
करोनामुळे आलेले नैराश्य कसे घालवावे? 'हे' उपाय करून तर पाहा
मकर : विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल. आपल्या आक्रमकतेला आवर घाला. छोट्या छोट्या मुद्यांवरून वाद शक्य. मात्र, सामंजस्याने केलेला व्यवहार उपयुक्त ठरेल. कुटुंबातील वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे लाभदायक ठरू शकेल. व्यवसायिक हितशत्रू पराभूत होतील. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतील. नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम काळ. धन-संपदा वृद्धिंगत होईल.
कुंभ : जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गोष्टींवर पैसे खर्च होतील. परदेशातील नात
Post a Comment