माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -भारताची अर्थव्यवस्था १०.३ टक्क्यांनी घसरणार असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे. करोना व्हायरस आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाउन याचा गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा दर १०.३ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.जगाच्या अर्थव्यवस्थेत ४.४ टक्क्यांनी घट होईल. मात्र २०२१ मध्ये हे चित्र बदलेल असंही IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.
आंतराराष्ट्रीय नाणेनिधीने जगातल्या अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालामध्ये हे सगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. हा अहवाल वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सादर केला आहे. २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ४.४ टक्क्यांनी घसरेल आणि २०२१ मध्ये ५.२ टक्क्यांनी वधारेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ५.८ टक्के घसरण होईल असाही अंदाज आहे. तर २०२१ मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था ३.९ टक्के वधारेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Post a Comment