माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - माहितीची गोपनीयता आणि तिच्या संरक्षणाच्या मुद्यावर संयुक्त संसदीय समितीने फेसबुक आणि ट्विटर या बडय़ा समाजमाध्यमांना गुरुवारी समन्स बजावले.
वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक २०१९संबंधी संयुक्त समितीपुढे शुक्रवारी हजर राहावे, असे आदेश फेसबुकच्या भारतातील प्रतिनिधींना देण्यात आले आहेत. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी या समितीच्या अध्यक्ष आहेत. लोकसभा सचिवालयाने बजावलेल्या नोटिशीनुसार ट्विटरच्या अधिकाऱ्यांना २८ ऑक्टोबरला समितीपुढे हजर राहावे लागणार आहे.
याच मुद्दय़ावर अॅमेझॉन व गूगलच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याबाबत समिती विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या समाजमाध्यमांना पाचारण करण्याच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे अनुचित व अन्यायकारक होईल, असे मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.
Post a Comment