धोक्याची घंटा!; राज्यात आज पुन्हा वाढले नवीन रुग्णांचे प्रमाण

 


माय अहमदनगर वेब टीम

बई: राज्यात आज २१३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या आजारामुळे एकूण ४२ हजार ४५३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार १५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ४२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार २६५ इतकी आहे. 

राज्यात गेले काही दिवस नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा होता. आज हे प्रमाण थोडेसे उलट झाले. आज ७ हजार ४२९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले तर त्याचवेळी ८ हजार १५१ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही कालच्या तुलनेच किंचित वाढला. करोनाच्या विळख्यात सापडलेल्या तब्बल १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्णांनी आतापर्यंत या आजाराला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ८६.५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या ८२ लाख ५१ हजार २३४ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १६ लाख ९ हजार ५१६ म्हणजेच १९.५१ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २४ लाख ३४ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत आणि २३ हजार ४८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात आज २१३ करोना मृत्यूंची नोंद झाली असून करोना मृत्यूदर २.६४ टक्के इतका आहे. २१३ पैकी ११४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर ६९ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आज सर्वाधिक ४५ मृत्यूंची नोंद मुंबई महापालिका हद्दीत झाली तर पुणे महापालिका हद्दीत २२ तर पुणे जिल्ह्यात (पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्र वगळून) ३२ जण करोनाने दगावले. 

- राज्यात सध्या १ लाख ७४ हजार २६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- सर्वाधिक ३७ हजार ६१३ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

- ठाणे जिल्ह्यात २८ हजार ४०३ तर मुंबई पालिका हद्दीत १९ हजार ५५३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

- नाशिक जिल्ह्यात ११ हजार ७३२ इतका अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा असून नागपूर जिल्ह्यात हीच रुग्णसंख्या ६ हजार ७६७ इतकी खाली आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post