करोनाचा लढा निर्णायक वळणावर; CM ठाकरेंनी सांगितला 'हा' उपाय

 



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - राज्यात करोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. करोनाचे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. महाराष्टाचा करोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठी अफेरेसिस युनिटचे दूरदृष्य प्रणालीच्या सहाय्याने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी अशी व्यवस्था झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला, असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

'करोनाची लस प्राप्त होईपर्यंत मास्कच हीच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता अशी मां कसम सर्वानी घ्यावी,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post