माय अहमदनगर वेब टीम
कोलकाता - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, अहमदाबाद येथे पुढील वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या भारत दौर्यात दिवस रात्र कसोटीचे आयोजन होईल. इंग्लंड पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान पाच कसोटी आणि निर्धारित षटकाच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहेत.
भारतामध्ये कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती पाहता ही मालिका यूएई येथे स्थानांतरित होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती सध्या यूएईमध्ये आयपीएल सुरू आहे. बीसीसीआय भारतातच इंग्लंडचे यजमानपद भूषविण्यास प्रतिबद्ध आहे यासोबत बीसीसीआय सर्व पर्यायावर विचार करत आहे. ज्यामध्ये जैविक रुपात सुरक्षित वातावरण तयार करण्याचा देखील समावेश आहे. कसोटी मालिकेतील तीन संभाव्य स्थळ अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता असू शकतात पण, गांगुलीनुसार अजून अंतिम निर्णय घेतला नाही.
गांगुली म्हणाले की, आम्ही योजना बनवली आहे पण, अंतिम निर्णय घेतलेला नाही. अजून आमच्याकडे चार महिने आहेत. बीसीसीआय अध्यक्ष यांच्यानुसार सध्या आमची प्राथमिकता ऑस्ट्रेलियाचा अगामी दौरा असून त्याच्यासाठी संघनिवड काही दिवसात होईल. गांगुलीने सांगितले की, इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा आहे. काही दिवसात संघाची निवड होईल. बीसीसीआयने एक जानेवारी पासून रणजी ट्रॉफी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत याबाबत चर्चा केली जाईल असे गांगुलीने सांगितले.
Post a Comment