अहमदनगरमध्ये 'या' गावात कोरोनाचा कहर



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : जिल्ह्यात करोना रूग्णांचे प्रमाण कमी झालेले असताना नगर तालुक्यात अकोळनेर येथे अचानक ३८ जण करोनाबाधित आढळून आले आहे. याशिवाय १२९ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

भजनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आले होते. नंतर काहींना अस्वस्थ वाटू लागल्याने आरोग्य यंत्रणेने ॲंटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. यात तब्बल ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

  या पार्श्वभूमीवर अकोळनेर गाव सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. गावात कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन माजी सरपंच अनिल मेहेत्रे यांनी केले आहे .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post