दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचा खुलासा केला आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अचानक संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणित वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ५९,५४० नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ६ हजार ७२५ नमुने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच जवळपास तब्बल ११.२९ टक्के नमुने करोना संक्रमित आढळले आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रावरचा ताण वाढणार असल्याचं दिसतंय.दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या ६ हजार ७९८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णांलयात भर्ती आहेत. ९७३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३५८ रुग्ण कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसंच २१ हजार ५२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post